जखमा शिवण्यासाठी स्मार्ट धागा तयार

jakham
ऑपरेशन अथवा अपघाताच्या प्रसंगी होणार्‍या जखमा शिवण्यासाठी एक अनोखा धागा संशोधकांनी तयार केला आहे. हा स्मार्ट धागा नॅनो आकाराच्या सेंसर व इलेक्ट्रॅनिक्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. हा धागा जखमेच्या स्थितीवरही नजर ठेवणार आहे. टफ्टस् विद्यापीठातील संशोधकांच्या टीमने हा धागा तयार केला असून या टीममध्ये एका भारतीय संशोधकाचाही सहभाग आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार जखमांची स्थिती जाणून घेण्यासाठी कांही वेळा कांही उपकरणेही गंभीर जखमा असतील तर रूग्णावर प्रत्यारोपित करावी लागतात. हा स्मार्ट धागा ती गरज संपविणार आहे. या धाग्यातील सेंसरमुळे जखमा शिवलेल्या भागातील स्नायूंची परिस्थिती, पीएचडी व ग्लुकोजची पातळी समजेल. जखम कशी भरतेय, आत संसर्ग झालेला नाही ना अथवा कांही विशेष रासायनिक बदल शरीरात होत नाहीत ना ही माहितीही त्वरीत मिळू शकणार आहे. धाग्यावरील माहिती स्मार्टफोन अथवा संगणकावर घेता येणार आहे. त्यामुळे जखम बँडेजमध्ये असली तरीही वरूनच सारी माहिती मिळणार आहे. या धाग्याचे उंदरांवरचे प्रयोग यशस्वी ठरले असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment