शौचालय उभारण्यासाठी गहाण ठेवले सौभाग्य लेणे

magalsutra
सासाराम- एका महिलेने रोहतास जिल्ह्यातील बरखाना गावात शौचालय उभारण्यासाठी आपले सौभाग लेणे (मंगळसूत्र) गहाण ठेवल्याची घटना घडली असून या महिलेला या घटनेनंतर स्वच्छता अभियानाची सदिच्छा दूत करण्यात आले आहे. एका प्राथमिक शाळेत स्वयंपाकी म्हणुन काम करणाऱ्या फुलकुमारी यांच्याकडे शौचालय बांधण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. त्याचे पती मजुरी करतात. शौचालय बांधण्यासाठी मंगळसूत्र गहाण ठेवण्याच्या तिच्या निर्णयाला तिच्या कुटूंबातील अन्य सदस्यांनी विरोध दर्शवला होता. जिल्हा प्रशासनाने तिला १० दिवसात शौचालय उभारुन देण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Comment