जगातील श्रीमंत महिला डॉन

sandra
डॉन, गॅगस्टर, क्रिमिनल असे शब्द उच्चारले गेले की साहजिक पुरूष व्यक्तीच नजरेसमोर येतात. मात्र पुरूषांचे वर्चस्व असलेल्या या जगात महिलांनीही पुरूषांइतकाच दबदबा निर्माण केला आहे आणि बेसुमार संपत्तीही जमविली आहे. या महिला डॉन केवळ खतरनाक म्हणून प्रसिद्ध नाहीत तर त्यातल्या कांही जणी ग्लॅमर साठीही प्रसिद्ध आहेत.

या यादीत आघाडीवर आहे सँड्रा अवीला बेलट्रेन ही मेक्सिकोतील ड्रग माफिया महिला. या बयाने १०० कोटी डॉलर्सची संपत्ती जमा केली आहे. केवळ ड्रग्ज तस्करीच नाही तर अवैध शस्त्र विक्री आणि मनी लाँड्रींगसाठीही ती माहिर असून ती सध्या जेलमधून नुकतीच बाहेर आल्याचेही समजते. सँड्राने दोन वेळा लग्न केले पण या दोघांचेही खून झाले. तिचे पतीही ड्रग माफियाच होते. तिच्या मुलाचे अपहरण केले गेले होते व त्यासाठी तिने ३३ कोटींची खंडणीही दिली होती व मुलाची सुटका केली होती.

claudia
क्लाऊडिया फेलिक्स ही मेक्सिकोतीलच डॉन महिला मिलेनिअर क्लबमध्ये सामील आहे. संघटीत गुन्हेगारीतील किम कार्दिशिया अशी तिची ओळख आहे. ही बया तिच्या ग्लॅमरसाठीही प्रसिद्ध असून सोशल मिडीयावर तिचे अनेक फॉलोअर आहेत. मेक्सिकोतील सर्वात धोकादायक गँग लॉस एंट्रेक्सची ही म्होरक्या असून ही टोळी पैसे घेऊन म्हणजे फी घेऊन गुन्हे करण्याची कामे करते. अमली पदार्थांची तस्करी हा त्यांचा मुख्य धंदा असून क्लाऊडिया तीन मुलांची आई आहे. तरीही तिच्या सौंदर्यासाठी ती चर्चेत असते.

Leave a Comment