वाहतूक डेबिट कार्ड देणारा भारत जगातला पहिला देश

card
मेट्रो, बस अथवा भारतात कोणत्याही प्रकारच्या वाहतूक वाहनांसाठी यापुढे वेगवेगळी कार्ड वापरण्याची गरज राहिलेली नसून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू पडेल असे एक कार्ड लवकरच लाँच केले जात आहे. विशेष म्हणजे याच कार्डावर युजर खरेदीही करू शकणार आहे. जगात आत्तापर्यंत सिंगापूरच्या थोड्या भागात असे कार्ड वापरले जात आहे मात्र ते संपूर्ण सिंगापूर साठी नाही. त्यामुळे असे कार्ड लागू करणारा भारत जगातला पहिला देश ठरणार आहे.

नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया व सी डॅक यांच्या संयुक्त प्रयत्नातून असे स्मार्टकार्ड तयार केले गेले आहे. स्मार्ट नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड असे त्याचे नाव अ्रसून ते आक्टोबरपासून वितरीत केले जाणार आहे. हे स्मार्टकार्ड डेबिट फिचरसह आहे. साप्ताहिक, मासिक, डेली पास साठीही त्याचा वापर होऊ शकणार आहे. या कार्डसाठी ईव्हीएम ओपन यूज तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.

Leave a Comment