लडाखच्या पहाडांत होणार औषधी वनस्पतींची शेती

ladakh
आयुर्वेदिक औषध उत्पादन कंपनी डाबर व रक्षा अनुसंधान व विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ यांच्यात लडाखच्या दुर्गम पहाडांवर औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी संयुक्त करार नुकताच करण्यात आला असल्याचे समजते. या दोन्ही संस्था येथील स्थानिक शेतकर्‍यांना या प्रकारच्या शेतीसाठीचे प्रशिक्षण देणार आहे. यामुळे औषधी वनस्पतींच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेलच पण येथील शेतकर्‍यांच्या कमाईतही वाढ होऊ शकणार आहे.

डीआरडीओच्या डीआयएचएआर या विभागाचे प्रमुख भुवनेश कुमार म्हणाले या भागातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे यासाठी टाकलेले हे पहिलेच पाऊल आहे. त्याचबरोबर लेह लडाख संरक्षण व पर्यावरण विकासासाठीही त्याचा फायदा होऊ शकणार आहे. या भागाचा विकास साधण्याचे कामही त्यात साधले जाणार आहे.

Leave a Comment