पाकच्या ‘काळ्या दिवसा’ला भारतीय नेटकरी फासणार काळे

indian-army
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या विविध ग्रुपवर सध्या एक संदेश फिरत असून नेटक-यांकडून या संदेशाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
भारतीय जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणीला यमसदनी धाडल्यानंतर काश्मीरमध्ये अशांततेचे वातावरण आहे. त्यातच १९ जुलै हा दिवस पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार असल्याचे पाकिस्तानी सरकारने जाहीर करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

पण आता भारतीय पाकच्या या चीड आणणाऱ्या घोषणेला चोख उत्तर देण्यासाठी पुढे आले आहेत. १९ जुलै हा दिवस पाकिस्तानने ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्याचे जाहीर केले असले तरी भारतीयांनी पुढचे २४ तास तरी आपला फेसबुक आणि व्हॉट्स अॅपचा प्रोफाईल पिक्चर बदलून त्याजागी भारतीय सेनाचा फोटो ठेवावा, असे आवाहन करणारा संदेश व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. भारतातील मोठा वर्ग हा व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर अँक्टिव्ह असतो. हे दोन्ही वापरणाऱ्यांची संख्या भारतात अधिक आहे तेव्हा सगळ्यांनी फोटो बदलून भारतीय सेनेला पाठिंबा देण्याचे आवाहन या संदेशातून करण्यात आले आहे.

Leave a Comment