जागतिक वारसा यादीत नालंदा, कांचनजुंगा व कॅपिटल कॉम्प्लेक्स

nalanda
दिल्ली- संयुक्त राष्ट्रसंघाच्या सांस्कृतिक संघटनेने म्हणजेच युनेस्कोने या वर्षीच्या जागतिक वारसा यादीत भारतातील तीन स्थळांना मान्यता दिली आहे. तुर्कस्तानातील इस्तंबुल येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या ४० व्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे एकाच बैठकीत एकाच देशातील तीन स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

kanchan
बिहारमधील नालंदा विद्यापीठचा या यादीत प्रथम समावेश केला गेला. त्यानंतर दोन दिवसांतच चंदिगढच्या कॅपिटल कॉम्प्लेक्स व सिक्कीममधील कांचनजुंगा नॅशनल पार्कला या यादीत स्थान देण्यात आले. तुर्कस्तानातील लष्करी विद्रोहामुळे ही बैठक आटोपती घेण्यात आली होती ती रविवारी पुन्हा पुढे सुरू करण्यात आली होती. चंदिगढचे कॅपिटल कॉम्प्लेक्स हे भारतातील १७ वे जागतिक वारसा स्थळ ठरले आहे.

capital
या वास्तूचा आराखडा फ्रेच स्विस अर्किटेकट ला कार्बूएझ यांनी १९५० साली तयार केला होता. कार्बूएझ यांनी सात देशात उभारलेल्या अनेक वास्तूंना जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. सिक्कीममधील कांचनजुंगा नॅशनल पार्क हे मैदान, उंच पहाड व झरे असे अनेक वैविध्य असलेले पार्क असून या ठिकाणांबद्दल अनेक लोककथा सांगितल्या जातात. येथील गुहा, झरे, नद्या यांची आजही स््थानिक लोक पूजा करतात. जगाच्या विविध देशातील सांस्कृतिक अथवा खास भौगोलिक विशेषता असलेल्या विभिन्न स्थळे, इमारती, शहरे, कॉम्प्लेक्स, वाळवंट, जंगले, झरे, पहाड यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान दिले जाते.

Leave a Comment