एअरटेलच्या इंटरनेट पॅकच्या दरात मोठी कपात

airtel
मुंबई : आता एअरटेलनेही आयडियाने इंटरनेट पॅकच्या दरात कपात केल्यानंतर आपल्या इंटरनेट पॅकच्या दरात मोठी कपात केली आहे. यूझर्ससाठी आयडिया तसेच रिलायन्स जिओ यांनी स्वस्तात इंटरनेट सेवा सुरु केल्यानंतर या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एअरटेलनेही त्यांच्या डेटा प्लानच्या दरात कपात केली आहे. काही डेटा प्लानच्या दरात तब्बल ६७ टक्क्यांइतकी कपात करण्यात आली आहे.

या कपातीअंतर्गत ६५५ रुपयांचा ४जी/३जी डेटा प्लानमध्ये आता यूझर्सना ३ जीबीऐवजी ५ जीबी डेटा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ४५५ रुपयांच्या ४जी/३जी प्लानमध्ये यूझर्सला २ जीबीऐवजी ३ जीबी डेटा पुरवला जाईल. ९८९च्या ४जी/३जी डेटा प्लानमध्ये याआधी ६.५ जीबी डेटा मिळत असे. दरकपातीअंतर्गत आता या प्लानमध्ये यूझर्सला १० जीबी डेटा मिळणार आहे.

Leave a Comment