मुंबई: एक नव्या सोशल प्लॅटफॉर्म ‘चॅटबोट’ची घोषणा अमेरिकन चेन रेस्टॉरंटने पिझ्झा हट आणि आपल्या इतर उत्पादनांच्या ऑर्डरसाठी केली आहे. यामुळे आता सोशल मीडियावरील चॅटसोबतच जेवणाची ऑर्डर देणेही शक्य होणार आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वच पिझ्झा हटवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २०१६मध्ये याची सुरुवात सान-फ्रान्सिस्कोमध्ये वेंचरबीट मोबाईलवीट कॉन्फरन्समध्ये मुख्य डिजिटल अधिकारी बॉरन कॉसर्स यांनी एका डेमोच्या माध्यमातून केली होती.
फेसबुक-ट्विटरद्वारे मागवू शकता पिझ्झा !
पिझ्झा हटसाठी ऑर्डर घेणारा हा नवा मंच ग्राहकांसाठी आपल्या पसंतीचे जेवण पोहचवणारे सर्वात सोपे साधन असल्याचे बॉपन म्हणाले. या सुविधेसाठी कंपनीने कनवर्सेबल कंपनीसोबत सहकार्य करारही केले आहेत. या सुविधेमुळे फेसबुक किंवा ट्विटरच्या माध्यमातून चॅट करताना, तुम्ही तुमच्या पसंतीचे जेवण ऑर्डर करू शकाल. तसेच ग्राहकांना नवनव्या योजनांची माहितीही यावेळी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.