शाओमीचा दुसरा वर्धापन बंपर सेल

xiaomi
मुंबई : भारतीय बाजार पेठेत दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चीनची मोबाईल उत्पादक कंपनी शाओमीने तीन दिवसीय बंपर सेलचे आयोजन केले असून एमआयच्या काही महागड्या उत्पादनांवर 20 ते 22 जुलै दरम्यान दुपारी 2 वाजता विशेष सवलत जाहीर करण्यात येणार आहे.

या सेलमध्ये सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी 19 जुलैपर्यंत http://www.mi.com या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यात २,६९९ रूपयांच्या ब्लू टूथ स्पीकरवर ७०० रूपयांची सूट मिळेल. तसेच १०००० एमएएचचा एमआय पॉवर बँक, एमआय इन इयर कॅप्सूल, हेडफोन आणि एमआय इन इयर हेडफोन्‍स प्रो गोल्‍ड अशा काही उत्पादनांचा मर्यादीत स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Leave a Comment