सॅमसंग युजर्सनाही मिळणार जिओ फोर जी सिम

jio
रिलायन्स जिओ फोर जी नेटवर्कसाठी रिलायन्सचा लाईफ स्मार्टफोन खरेदी करण्याची गरज संपली असून ही सुविधा आता सॅमसंग युजरनाही मिळू शकणार आहे. जिओने सॅमसंग बरोबर केलेल्या भागीदारी करारामुळे हे शक्य होणार आहे. सॅमसंग युजरना जिओ प्रिव्ह्यू ऑफर दिली जाणार आहे. जिओने प्रथमच असा करार स्मार्टफोन कंपनीबरोबर केला आहे. कारण यापूर्वी रिलायन्सच्या फक्त लाईफ ब्रँडवरच फोर जी सिम दिले जात होते आता सॅमसंगच्या निवडक हँडसेटवरही तीन महिन्यांसाठी ही सेवा मोफत व अनलिमिटेड डेटासाठी दिली जाणार आहे.

सॅमसंग युजरना व्हाईस व एसएमएस ऑफरही मिळणार आहे तसेच मुव्ही, बुक्स व म्युझिक जिओ अॅप्सही मिळणार आहेत.ज्यांनी सॅमसंगचे नवे हँडसेट खरेदी केले आहेत अथवा करणार आहेत, त्यांना ही सेवा दिली जाणार असून ती सॅमसंग गॅलेक्सी ए५,ए७, ए८, नोट ४, नोट ५, नोट एज एस ६, एस ६ प्लस, एस ७ या मॉडेल्सवर मिळू शकेल. त्यासाठी माय जिओ हे अॅप युजरला डाऊनलोड करून घ्यावे लागेल. युजरना त्यानंतर कनेक्शनसाठी बुकींग करता येणार आहे.

Leave a Comment