वेळेपूर्वीच वितळले अमरनाथमधील बर्फाचे शिवलिंग

amarnath
श्रीनगर : बाबा बर्फानी या नावाने सुपरिचित असलेले अमरनाथमधील बर्फाचे शिवलिंग वेळेपूर्वीच वितळले आहे. यात्रा सुरू झाल्यानंतर १३ दिवसांतच शिवलिंग वितळण्याची ही नजिकच्या इतिहासामधली पहिलीच घटना आहे. शिवलिंग ग्लोबल वॉर्मिंगमुळे लवकर वितळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे यात्रेत वारंवार खंड पडत आहे. आतादेखील यात्रा दोन दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे.

Leave a Comment