भारतामध्ये लवकरच लाँच होणार मर्सिडीजची नवी रोडस्टर कार

mercedes
नवी दिल्ली : आपली नवी एएमजी एसएलसी ४३ (AMG SLC 43) रोडस्टर कार भारतामध्ये लवकरच लाँच करणार असल्याचे जर्मनची प्रसिद्ध वाहन निर्माण कंपनी मर्सिडीजने जाहीर केले आहे. या कारमध्ये ३.० लिटर बाय टर्बो व्हि इंजिन देण्यात आले असून ३६२ बीएचपीचे पॉवर आणि ५२० न्यूटन मीटरचा टार्क जनरेट करु शकतो. या कारमध्ये ९ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. मर्सिडीजच्या या कारचे स्पीड ० ते १०० किलोमीटर प्रति तास असून ती ४.७ सेकंदात स्पीड पकडू शकते. या कारचा टॉप स्पीड २५० किलोमीटर प्रति तास असणार आहे.