जगातील सर्वात महागडा चहा येथे मिळतो

tea
कोलंबो : श्रीलंकेच्या गॉलमध्ये जगातील सर्वाधिक महागड्या चहाची लागवड होते. याची लागवडही विशिष्ट पद्धतीने केली जाते. व्हर्जिन व्हाईट टी असे याचे नाव का ठेवण्यात आले याचे विशिष्ट कारण आहे. हा चहा बनवताना एकदाही यांच्या पानांवर हाथ लावला जात नाही. विशिष्ट पद्धतीने याची पाने तोडली जातात. तसेच सुकल्यानंतरही ही पाने सफेद होतात. त्यानंतर हा चहा बनवला जातो. या चहाच्या एका कपाची किंमत तब्बल दोन हजार रुपये असते.