नवी दिल्ली- लवकरच बँकेप्रमाणे आपल्याला ईपीएफओ अकाउंटमधून ऑनलाइन पैसा काढता येणार आहे. ऑक्टोबरपासून ही सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी एक स्वतंत्र सॉफ्टवेअर ईपीएफओने तयार केले आहे. या सॉफ्टवेअरची सध्या चाचणी सुरु आहे. ही सुविधा सुरु झाल्यानंतर देशभरातील ६ कोटी पीएफधारकांना फायदा होणार आहे
ऑक्टोबरपासून ऑनलाइन काढता येणार पीएफचे पैसे!
याबाबत माहिती देताना ईपीएफओचे सेंट्रल कमिश्नर डॉ. व्ही.पी. जॉय यांनी सांगितले की, ही सुविधा सुरू झाल्यानंतर पीएफधारकांना पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइनच अर्ज करता येईल. पीएफची रक्कम त्यांच्या थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे. ईपीएफओने यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. सॉफ्टवेअरची चाचणी अंतिम टप्प्यात असून सुविधा कार्यान्वित होण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.