स्मार्टफोनवर गेम खेळण्यात महिलांची आघाडी

games
स्मार्टफोन्सचा अनेक कामांसाठी वापर होत असला तरी त्याचा मनोरंजनासाठीही मोठ्या प्रमाणावर वापर होतो.अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहणे, चित्रपट पाहणे यासाठीही स्मार्टफोन सर्रास वापरले जातात तसेच विविध प्रकारचे गेम्स खेळण्यासाठीही स्मार्टफोनच्या स्क्रीनवर अनेकांची बोटे चालत असतात. आता गेम्स खेळण्यात मुले अथवा तरूण सर्वात जास्त अॅक्टीव्ह असतील असा जर तुमचा समज असेल तर तो या सर्वेक्षणाच्या अहवालावरून खोटा ठरेल. जगभरातील १२ देशात या संदर्भात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात स्मार्टफोनवर गेम्स खेळणार्‍यांत महिलांचा वाटा ४७ टक्के असल्याचे दिसून आले आहे.

महिलांना स्मार्टफोनवर गेम्स खेळणे आवडते असा खुलासा फेसबुकवरही केला गेला आहे. उत्तर अमेरिका, लॅटीन अमेरिका, युरोप, मध्यपूर्व, व आशियातील कांही देशात हे सर्वेक्षण केले गेले. अॅडविक डॉट कॉमवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार ७१ टक्के लोकांना स्मार्टफोन्सवर गेम खेळणे अधिक आवडते. ६४ टक्के लोक संगणकावर गेम खेळण्यास पसंती देतात तर ३४ टक्के लोक टॅब्लेटला व २६ टक्के लोक गेमिंग कंसोलवर गेम खेळणे पसंत करतात. बहुतेकांनी खेळांचा शोध सोशल मिडीयावर घेतल्याचेही यात दिसून आले आहे.

Leave a Comment