अंतराळात रोबो जोडू शकतील अशी दुर्बिण

telescope
वैज्ञानिकांनी रोबो अंतराळातच जोडू शकतील अशा महाकाय दुर्बिणीचे डिझाईन तयार केले असून या वैज्ञानिकांच्या चमूमध्ये एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. या दुर्बिणीमुळे ब्रह्मांडाच्या अंतरंगात डोकावण्याची वैज्ञानिकांची क्षमता कित्येक पटीने वाढेल असे सांगितले जात आहे. या नव्या डिझाईनमध्ये दुर्बिण अंतराळात सुट्या भागात नेऊन तेथे ती असेंब्ली रोबोंच्या सहाय्याने जोडली जाणार आहे.

आत्तापर्यंत बनविल्या गेलेल्या महाकाय दुर्बिणी पृथ्वीवर आहेतच पण त्या ठराविक जागीच बसवाव्या लागतात. त्यांच्यावर वातावरण व वायूंचा प्रभाव पडू शकतो. तसेच त्यांना ठराविक अंतराची सीमाही असते. अंतराळातील दुर्बिण फिरती ठेवता येणार आहे शिवाय तेथे वातावरणाचा प्रभाव पडण्याचा प्रश्न उद्भवत नाही.तसेच सीमेचे बंधन राहात नाही. यामुळे अधिक स्वच्छ प्रतिमा मिळू शकणार आहेत. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व नासाच्या जेट प्रोपल्शन लॅब मधील निकोलस ली व त्यांच्या टीमने हे डिझाईन तयार केले आहे. याचा दुसरा फायदा असा आहे की अंतराळात अंतराळवीरांना दमविणारे काम रोबोच्या माध्यमातून केले जाण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.

Leave a Comment