दुपारी तीननंतर भुशी डॅमवर नो एंट्री

bhushi-dam
मुंबई : वीकेंडला लोणावळ्याला जाणा-या पर्यटकांसाठी भुशी धरण दुपारी तीननंतर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असून दुपारी तीन नंतर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्याचबरोबर शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणाऱ्या लक्झरी बस, मिनीबस, टेंपो ट्रॅव्हलरसह अवजड वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Comment