मुंबई: तब्बल १ लाख ९० हजार कार होंडा कंपनीने परत मागवल्या असून कंपनीने या कार एअर बॅगच्या दुरूस्तीसाठी परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. कार मालकाकडून एकही रूपया न घेता एअर बॅग दुरूस्त किंवा बदली करून दिल्या जाणार आहेत.
तब्बल २ लाख कार होंडाने मागवल्या परत !
होंडा सिटी, जाझ, ऍकोर्ड, सिव्हीक आणि सीआरव्ही या मॉडेलचा यात समावेश आहे. जवळच्या होंडा सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन कारमालक कंपनीच्या स्किमचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, गेल्या दोन वर्षात होंडा कंपनीने अशा प्रकारे सात वेळा कार परत मागवल्याचा प्रकार घडला आहे. कंपनी सीआर-व्ही आणि सिव्हीक या कारची सर्वात आधी एअरबॅग दुरुस्ती करणार आहे. इतर मॉडेलच्या एअरबॅग दुरुस्तीचे काम सप्टेंबर २०१६ पर्यंत सुरु राहणार आहे.