मोफत कॉलसह जीओची फोरजी सेवा १५ ऑगस्टपासून

jio
रिलायन्स जिओ त्यांच्या फोर जी सेवेचे व्यावसायिक लाँचिग स्वातंत्र्यदिनादिवशी म्हणजे १५ ऑगस्टपासून करत आहे. कंपनीने त्यांचा पहिला फ्रीडम प्लॅन जाहीर केला आहे. त्यानुसार युजरला केवळ ८० रूपयांत १ जीबी डेटा मिळेलच शिवाय व्हॉईस कॉल फ्री मिळणार आहेत. कंपनीच्या या बंपर प्लॅनमुळे अन्य टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले असल्याचेही समजते. आयडिया, एअरटेलसारख्या कंपन्या १ जीबी साठी किमान १९९ रूपये चार्ज आकारत आहेत शिवाय कॉलसाठी युजरला वेगळे पैसे मोजावे लागतात. अन्य कर धरून युजरला हा खर्च साधारण महिना ३०० रूपये येतो. रिलायन्स जिओ युजरना हा खर्च जेमतेम १०० रूपये येणार आहे.

मुकेश अंबानी यांची जिओ म्हणजे दीड लाख कोटी गुंतवणुकीचे जगातले पहिले मोठे स्टार्टअप आहे. गेली सहा वर्षे कंपनी देशात फोर जी सेवा देण्याची तयारी करत आहे. २०१० साली कंपनीने देशभराचे फोरजी सेवेचे लायसन्स असलेली एक कंपनी खरेदी केली आहे. रिलायन्सच्या सुरवातीलच्या या बंपर प्लॅनमुळे टेलिकॉम कंपन्यात दर युद्धाला प्रारंभ होणार असून त्याचा थेट फायदा युजरना मिळणार आहे.

Leave a Comment