पोकेमॉन गो गेमची लोकप्रियता गगनाला भिडली

pokemon
जुलैच्या आठ तारखेला अमेरिकेत लाँच झालेल्या पोकेमॉन गो या रिअॅलिटी गेमची लोकप्रियता अल्पावधीत गगनाला भिडली असून सर्व वयोगटातील युजर या गेमसाठी वेडे झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत प्रंचड मोठ्या संख्येने युजरनी हा गेम डाऊनलोड केला असून गेम निर्माती कंपनी निन्टेंडी लिमिटेडचे मार्केट कॅपिटल ५० हजार कोटींनी वाढले असल्याचेही समजते. हा गेम आता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये लाँच केला गेला आहे. भारतात तो अजून अधिकृतपणे लाँच झालेला नाही.

या संदर्भात केल्या गेलेल्या निरीक्षणात असे आढळले की ज्या युजरनी हा गेम डाऊनलोड केला आहे ते रोज किमान ४३ मिनिटे तो खेळण्यात वेळ घालवित आहेत. गेल्या दोन दिवसांत ५ टक्के अँड्राईड युजरनी तो डाऊनलोड केला आहे. गेम अॅपने इंटरनेटवरही अनेक रेकॉर्ड नोंदविली असून हा गेम १८ ते २४ या वयोगटातील युजरमध्ये अधिक लोकप्रिय बनल्याचेही आढळले आहे.

Leave a Comment