नासाच्या जूनोने टिपले गुरुचे फोटो

nasa
वॉशिंग्टन – महाकाय गुरु आणि त्याच्या मोठमोठय़ा चंद्रांचे सर्वात पहिले छायाचित्र नासाच्या ‘जूनो’ अंतराळयानाने पृथ्वीवर पाठविले आहे. या रंगीत छायाचित्रात ज्युपिटरच्या वायुमंडळातील वैशिष्टय़े दिसून येतात. गुरु ग्रहावर पोहोचल्याच्या ६ दिवसानंतर यात बसविण्यात आलेल्या व्हिजिबल लाइट कॅमेरा ‘जूनो कॅम’ने आकर्षक छायाचित्रे घेतली आहेत. १० जुलै रोजी रात्री दीड वाजता छायाचित्र काढण्यास जूनोकॅमला यश मिळाले. अंतराळयान गुरुपासून त्यावेळी २.७ दशलक्ष मैलाच्या अंतरावर होते असे नासाकडून सांगण्यात आले. जूनोकडून आलेल्या या छायाचित्रात ग्रेट रेड स्पॉटसोबत गुरुच्या ४ मोठय़ा चंद्रांपैकी तीन-लो युरोपा आणि गॅनिमेड दिसून येते. गुरु ग्रहाची उकल करण्यासाठी आता अधिक वेळ लागणार नाही. जूनोकॅमद्वारे घेण्यात आलेल्या या छायाचित्रांमुळे यान ग्रहावर लवकरच पोहोचेल असा संकेत मिळतो असे संशोधक स्कीट बोल्टन यांनी सांगितले.

Leave a Comment