विक्रीसाठी उपलब्ध झाला शाओमीचा एमआय मॅक्स

xiomi
नवी दिल्ली : शाओमीच्या एमआय मॅक्स स्मार्टफोनचा गेल्या आठवड्यात फ्लॅश सेल पार पडल्यानंतर आता ओपन सेलसाठी उपलब्ध करुन देण्यात आला असून ऑनलाईन रिटेल पार्टनर अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, पेटीएम, स्नॅपडील या शॉपिंग वेबसाईटवर शाओमीचा एमआय मॅक्स स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आले आहे.

शाओमीने स्नॅपड्रॅगन ६५०, SoC, ३२ जीबी स्टोरेजसोबत एमआय मॅक्स स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. चीनमध्ये या स्मार्टफोनचे एकूण तीन व्हेरिएंट लॉन्च केले असून, लवकरच भारतात स्नॅपड्रॅगन ६५२ आणि ४ जीबी व्हेरिएंट लॉन्च करणार असून याची किंमत १९ हजार ९९९ रुपये असेल.

एमआय मॅक्समध्ये ६.४४ इंचाचा डिस्प्ले, मेटल बॉडी हँडसेट, १६ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिल्व्हर गोल्ड आणि डार्क ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता ४८५० mAh असून, रॅमची क्षमताही जबरदस्त आहे.

Leave a Comment