जुन्या स्मार्टफोनचा असा करा वापर

old-fon
आजकाल नवीन मॉडेल्स व अत्याधुनिक फिचर्सवाले स्मार्टफोन मोठ्या संख्येने बाजारात येत आहेत. स्पर्धात्मक किंमती आणि चांगली फिचर्स यामुळे जुना फोन टाकून नवीन घेण्याकडेही अनेकांचा कल आहे. मात्र जुने स्मार्टफोन अगदी फेकून देण्याच्याच लायकीचे आहेत असा समज असेल तर तो थोडा दूर ठेवा. हे जुने फोनही अनेक प्रकारे उपयोगात आणता येतात. कसे, त्याची ही माहिती.

जुन्या स्मार्टफोनमधील कॅमेरा घरासाठी स्पाय कॅमेरा म्हणून वापरता येतो हे अनेकांना माहिती झाले आहे. नवे कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यासाठी जुना स्मार्टफोन प्रथम वापरणेही फायदेशीर ठरते. कांही दिवस हे अॅप त्या फोनवर वापरल्यावर ते खरोखरीच कामाचे आहे वा नाही याचा निर्णय घेता येतो. यामुळे नव्या स्मार्टफोनची मेमरी न घालवता नवीन अॅप ट्राय करता येतात. घरात जुन्या स्मार्टफोनचा वापर व्हिडीओ चॅटसाठी करता येतो.

ऑफिसमध्ये असताना जुन्या स्मार्टफोनवर अर्थकॉम डाऊनलोड करून कनेक्ट केले तर दिवसभरातील नवे फोटो पाहता येतात तसेच आपल्या घराजवळील भाग सार्वजनिक कॅमेर्‍यांनी व्यापलेला असेल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वीच ट्रॅफिकच्या परिस्थितीवर नजर टाकण्यासाठीही जुने स्मार्टफोन वापरता येतात. मुलांसाठी जुने स्मार्टफोन कामाचे ठरतात. अँड्राईड ४.३ वा त्यानंतरच्या व्हर्जनचे जुने स्मार्टफोन मुलांसाठी वेगळे प्रोफाईल बनविण्यासाठी वापरता येतात. तसेच मुलांचे गेम्स डाऊनलोड करणे व अन्य शैक्षणिक माहितीसाठीही त्याचा वापर होतो. टब्लेट जुना झाला तर त्याचा उपयोग डिजिटल फोटोफ्रेमसारखा करता येतो. डे फ्रेम नावाचे अॅप डाऊनलोड केल्यास सर्व फोटो लोड करता येतातच पण इंस्टाग्राम अकौंटवरूनही फोटा यावर स्ट्रीम करता येतात.

Leave a Comment