व्हॉटसअॅप करणार बायबाय

whats
येत्या वर्षअखेरपासून म्हणजे ३१ डिसेंबरपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले व्हॉटसअॅप अनेक स्मार्टफोनधारकांचा निरोप घेणार असल्याचे समजते. विशेषतः सिबियन ओएस वर चालणार्‍या स्मार्टफोनना त्याचा अधिक फटका बसणार आहे कारण व्हॉटस्रअॅपने या ओएससाठीचे सर्व्हर बंद केले आहेत. व्हॉटसअॅप बंद होणार्‍यांत प्रामुख्याने ब्लॅकबेरी व नोकियाचे कांही फोन्स मॉडेल्स आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबरपासून ब्लॅकबेरीच्या कोणत्याही ओएसला व्हॉटसअॅप सपोर्ट मिळणार नाही नोकियाच्या सिबियन एस ४०, एस ६० ओएस असलेल्या फोन्सनाही व्हाटसअॅप सपोर्ट बंद होणार आहे. तर २०१७ पासून अँड्राईड २.१ एक्लेअर, २.२ फ्रियो, विंडोज फोन ७.१ यांना व्हॉटसअॅप सपोर्ट मिळणार नाही. व्हॉटसअॅपने या सर्व युजरना पुढच्या वर्षाच्या आत ऑपरेटिंग सिस्टीम अपग्रेड करा असा सल्लाही दिला आहे.

Leave a Comment