भारतातील हायवे बांधकामासाठी चीनी कंपनीची बोली

highway
जगातील बड्या बांधकाम कंपन्यात गणना होत असलेल्या चायना रेल्वे कन्स्ट्रक्शन कार्पोरेशनने भारतातील हायवे बांधकामासाठी बोली लावण्यात रस दाखविला आहे. नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राघव चंद्रा यांच्याबरोबर वरील कंपनीतील अधिकार्‍यांची एक बैठक सोमवारी पार पडली असल्याचेही समजते.चायना कंपनीने ३ हजार किलोमीटर हायवेसाठी ही बोली लावली असून त्यासाठी ३५ ते ४० हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.

चायना रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीने चीनमधील एकूण हायवेच्या ६० टक्के तर रेल्वे ट्रॅकपैकी ८० ट्क्के काम केले आहे. इंडिया रोड ट्रान्स्पोर्ट मंत्रालयाने एका वर्षात १५ हजार किलोमीटर रस्तेबांधणीचे तसेच २५ हजार किलोमीटर हायवेसाठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचे ठरविले आहे. १५ हजार किलोमीटरच्या रस्त्यासाठी दीड लाख कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.त्यातील निम्नी रककम केंद्र सरकार देणार आहे तर बाकी रक्कम विदेशी गुंतवणूक व बांधकाम कंपन्यांकडून गोळा केली जाणार आहे. रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी त्यांच्या अमेरिका भेटीत जे.पी. मॉर्गन तसेच गोल्डमॅन सॅक्ससारख्या गुंतवणूक कंपन्यांशी चर्चा करणार आहेत असेही समजते.

Leave a Comment