नेव्हल शिपमध्ये दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी

ship
मुंबई: आयटीआय (एनसीव्हिटी) पात्र उमेदवारांकडून नेव्हल शिप रिपेअर यार्ड आणि नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड (केओसी) चे ॲप्रेन्टिसेस ट्रेनिंग स्कूल उमेदवारी प्रशिक्षणाकरिता अर्ज मागवित असून याबाबतची माहिती राज्य सरकारचे संकेतस्थळ ‘महान्यूज’वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इलेक्ट्रीशिअन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक, फिटर, पेंटर (जनरल), मशिनिस्ट, टर्नर, एमआरएसी, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रीक), इलेक्ट्रो प्लॅटर, कॉम्प्युटर ऑपरेशन ऑफ प्रोग्रॅमिंग असिस्टंट (सीओपीए), इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, टेलर, मेकॅनिक मोटर वेहिकल (एमएमव्ही) हे प्रशिक्षण दोन वर्ष कालावधीचे आहेत.

या प्रशिक्षणासाठी उमेदवार हे किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय (एनसीव्हीटी) मध्ये ६५ गुण प्राप्त केलेले असावेत. उमेदवाराने ०१ ऑक्टोबर, २०१६ रोजी वयाची १४ वर्षे पूर्ण केलेली असावीत, परंतु त्याचे वय २१ वर्षे पूर्ण झालेले नसावे. सरकारच्या आरक्षणाच्या नियमानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयोमर्यादेत २१ वर्षे सवलत आहे. उमेदवारास अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जुलै, २०१६ अशी आहे. उमेदवारांनी आपला अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावेत.

पत्ता : द ॲडमिरल सुपरिटेंडंट, नेव्हलशिप रिपेअर यार्ड, नेव्हल बस, कोची – ६८२००४

Leave a Comment