आता हँगआऊटवरून हि करा व्हिडिओ कॉलिंग

google
नवी दिल्ली – सध्याच्या मेसेजिंग अॅपमधील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुगलने हँगआऊटमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू केली असून तुम्हाला या सेवेचा लाभ व्ही.११.० या अपडेटद्वारे घेता येणार आहे. अॅपल मोबाईल धारकांसाठी तब्बल दोन वर्षापूर्वी आलेली ही सुविधा आता ऍण्ड्राईड धारकांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सध्या ही अपडेट गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसली तरी एपीके मिररद्वारे तुम्ही ती मिळवू शकता. २०१४पासून आयओएस धारकांसाठी ही सुविधा उपलब्ध असल्याने त्यांना अॅप स्टोअरवर ही अपडेट उपलब्ध आहे. नव्या अपडेटनुसार आयओएस धारकांसाठी व्हिडिओ कॉलिंगचा कालावधी दोन मिनिटे करण्यात आला असून ऍण्ड्राईड धारकांना मात्र एक मिनिटांचीच मर्यादा ठेवण्यात आली आहे.

व्हॉट्‌स अॅप आणि हाईक सारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी गुगल हँगआऊटने कात टाकली असून ग्रुप चॅटची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच यापूर्वी असलेली हँगआऊट आणि टेक्‍स्ट मेसेज एकत्र करणारी यंत्रणा रद्द केली आहे. या एकत्रित यंत्रणेमुळे युजर्सना हँगआऊट आणि टेक्‍स्ट मेसेजमध्ये संभ्रम निर्माण होत होता.

Leave a Comment