महिलांना नाही आवडत असे पुरूष

mens
पुरूष वर्ग आपल्याकडे आकर्षित व्हावा अथवा त्यांनी आपल्याकडे वळून वळून पाहावे अशा इच्छेने महिला कांही ना कांही फंडे वापरत असतात असा सार्वजनिक समज आहे व तो कांही अंशी खराही आहे. पण महिलांप्रमाणेच पुरूषवर्गाकडूनही असे प्रयत्न केले जात असतात व त्यासाठी पुरूष वर्गही कांही ना कांही क्लृप्त्या लढवत असतात. महिला वर्गाला कसे पुरूष जास्त भावतात याची कांही परिमाणे नक्की आहेत. तर कांही प्रकारचे पुरूष महिलांना अजिबात आवडत नाहीत. कोणते पुरूष महिलांना नकोसे होतात त्याची ही कांही निरीक्षणे

महिलांना सर्वसाधारणपणे नम्र, सरळ वागणारे, व चांगल्या मॅनर्सचे पुरूष आवडतात. कामाच्या ठिकाणी अथवा अगदी घरातही परूषांचे एकूण वागणे, विचार, व व्यवहार कसे आहेत यावर बायकांचे बारीक लक्ष असते.

१) स्वतःच शहाणे – कांही पुरूष स्वतःला सर्वोच्च समजतात. प्रत्येक गोष्टीत त्यांचा मी मी पणा असतो. सगळीकडे स्वतःचाच डंका वाजविण्याची त्यांची सवय असते व सगळे काही स्वतःलाच कळते अशी त्यांची वर्तणूक असते. अशा पुरूषांना महिला शक्यतो टाळतात. अशा पुरूषांऐवजी महिलांना समान वागणूक देणार्‍या, त्यांच्या मताची कदर करणार्‍या पुरूषांकडे त्या जास्त आकर्षित होतात.

२)अधिकार गाजविणे- अधिकार गाजविणारे पुरूष महिलांना आवडतात असा एक समज आहे. मात्र तो तितकासा खरा नाही. प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणे आणि बारीकसारीक वस्तूंवरही अधिकार दाखविणे महिलांना फारसे रूचत नाही.

३)पुस्तकातले किडे-जेव्हा तेव्हा पुस्तकांबद्दल बोलणारे, पुस्तके हेच जग मानणारे आणि पुस्तकांत रमलेले पुरूषही महिलांना फारसे पसंत पडत नाहीत. अशा पुरूषांपासून चार पावले दूर राहणे त्या पसंत करतात. त्याऐवजी गप्पा मारताना दुसर्‍यांच्या आवडी जाणून घेणारे, मिळून मिसळून राहणारे व एकंदर मित्रमंडळीत आवडते असलेले पुरूष त्यांना अधिक आवडतात.

४)बोलणे- बोलण्याचा मुख्य मक्ता महिलांकडे असला तरी उठसूठ घाणेरड्या कॉमेंट करणारे, बोलताना सतत शिव्या वापरणारे पुरूष महिलांचा विश्वास कधीच जिंकू शकत नाहीत.
———

Leave a Comment