नवी दिल्ली: आता जगातील सर्वात स्वस्त एचडी एलईडी टीव्ही लाँच करण्याच्या तयारीत जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ बाजारात आणणारी रिंगिंग बेल्स हि कंपनी असून हा टीव्ही २५ जुलैला लाँच करणार आहे. याची किंमत ९,९९० रु. आहे.
जगातील सर्वात स्वस्त एचडी एलईडीचे २५ जुलैला लाँचिंग!
याबाबत कंपनीचे सीईओ मोहित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडामध्ये एका खास कार्यक्रमात २५ जुलैला या एलईडी टीव्हीचे लाँचिंग करण्यात येणार असून यासाठी बॉलिवूडमधील अनेक बडे स्टार हजेरी लावणार आहेत. ३१.५ इंचीच्या या एचडी एलईडी टीव्हीचे बुकींग २६ जुलैपासून सुरु होणार असून १५ ऑगस्टपासून याचे वितरण होणार आहे.