अवघ्या ४७९९ रुपयांमध्ये इंटेक्सचा नवा टॅबलेट

intex
नवी दिल्ली : आपला सर्वात स्वस्तातील नवा आय बडी इन-७डीडी०१ (I-Buddy IN-7DD01) हा टॅबलेट भारताची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी इंटेक्सने नुकताच लाँच केला असून अॅमेझॉन इंडिया या वेबसाइटच्या माध्यमातून हा टॅबलेट ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.
intex1
या टॅबलेटमध्ये ७ इंचाचा एचडी डिस्प्ले असून यात मीडियाटेक एमटी ८३२१ क्वाडकोरचा प्रोसेसर तसेच अँड्राइड ४.४ लॉलीपॉपचे ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे. त्याचबरोबर १ जीबी रॅम आणि ८ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा २ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा ०.३ मेगापिक्सलचा आहे. याच्या बॅटरी क्षमता २८०० mAh ऐवढी आहे. यात डय़ुअल सीम स्लॉट, वायफाय ८०२.११ b/g/n, ब्लूटूथ ४.०, जीपीएस आणि ओटीजी सपोर्टसह USB पोर्ट अशा कनेक्टीव्हिटी देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment