रेनो क्विडसाठी ४ ते ६ महिन्यांचे वेटिंग

kwid
मुंबई : आतापर्यंत या कारने दीड लाखांहून अधिक बुकिंग्जचा टप्पा सप्टेंबर २०१५ मध्ये लॉन्च झालेली प्रसिद्ध हॅचबॅक कार रेनो क्विडने पार केला आहे. एक वर्षही एंट्री लेव्हल हॅचबॅक लॉन्च करुन पूर्ण झालेला नाही, तोच कारच्या एवढ्या बुकिंग झाल्यने कारची लोकप्रियता लक्षात येते. ४ ते ६ महिन्यांची वेटिंग या कारसाठी आहे.

कंपनीने वेटिंग टाईम कमी करण्यासाठी रेनो क्विडचे प्रॉडक्शन प्रत्येक महिन्याला १० हजार यूनिटपर्यंत वाढवण्यात आले आहे. कंपनीने रेनो क्विड कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिले असून यामध्ये इलेक्ट्रिक पॉवर स्टिअरिंग, वन-टच लेन चेंज इंडिकेटर, पॉवर विंडो, इंफोटेनमेंट सिस्टम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यूएसबी, ऑक्स-इनपुट पोर्ट आणि स्पीड सेन्सिंग इत्यादी फीचर्सचा समावेश आहे. कंपनीने या कारसोबत ५० हजार किलोमीटर/२ वर्षांपर्यंत मेन्टेनन्स पॉलिसी आणि २ वर्षांपर्यंत रोड साईड असिस्टन्सही जाहीर केले आहे. ९८ टक्के या कारची निर्मिती भारतात करण्यात आली आहे.

Leave a Comment