मातृत्वाच्या चाहुलीचे दिवस

preganancy
प्रत्येक स्त्रीला आई होण्याची आस असतेच. जेव्हा तिला मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंद होतो परंतु ते पहिले दिवस बरेच अवघडही असतात. मळमळणे, शिसारी येणे, सकाळी झोपेतून उठल्यानंतर अशक्तपणा जाणवणे, गरगरणे किंवा उलटी होणे अशा प्रकाराने गरोदर अवस्थेच्या पहिल्या काही दिवसात महिला त्रस्त होऊन जातात. त्यावर उपाय म्हणून काय करावे याबाबत काही स्त्रीरोग तज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. कोणत्याही गोष्टीची शिसारी घालवण्यासाठी थंड पाण्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकावे आणि त्या पाण्याचा वास घ्यावा किंवा लिंबू पिळल्यानंतर राहिलेली फोड चघळावी. शिसारी कमी होते.

कच्चे दूध पिणे हासुध्दा या त्रासावर उपाय आहे. त्यामुळे उलटी होत नाही. फळांचे किंवा भाज्यांचे सलाड खाण्याचा सल्ला या दिवसात दिला जातो. अशा सलाडवर आले किसून त्याचा थोडासा किस टाकावा आणि मग सलाड खावे किंवा हेच आले चहात घालावे. पेपरमिंट चहा पिणे हाही शिसारीवर चांगला उपाय आहे. त्यानेही उलटी थांबते किंवा उसळ खावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment