गुगल भारतात २० लाख डेव्हलपरना प्रशिक्षण देणार

developer
तंत्रक्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल येत्या दोन वर्षात भारतात अँड्राईड मंचावर सुमारे २० लाख डेव्हलपरना प्रशिक्षण देणार आहे. यामुळे देशात उच्च गुणवत्ता असलेल्या तरूणांना फायदा मिळणार आहे. सध्या देशात १० लाख लोक अँड्रईड मोबाईल विकसित करण्यात कार्यरत आहे. ही संख्या २०१८ पर्यंत ४० लाखांवर नेली जाईल असे गुगलचे उपाध्यक्ष सीजर सेनगुप्ता यांनी सांगितले.

सेनगुप्ता म्हणाले २०१८ पर्यंत अमेरिकेला मागे टाकून भारताला जगातील सर्वात मोठे डेव्हलपर केंद्र बनविण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. या काळात डेव्हलपरची संख्या४० लाखांवर गेली तरी त्यातील २५ टक्के मोबाईलवर काम करतील. भारताला जगातले अॅप विकास केंद्र बनवून जगाचे नेतृत्व भारताने करावे यासाठी सहाय्य केले जात आहे. त्यासाठी अँड्राईड फंडामेंटल संदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले गेले आहेत. हे प्रशिक्षण सर्व सरकारी तसेच खासगी विद्यापीठांतून तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांवर उपलब्ध करून दिले जात आहे.

Leave a Comment