क्वालकॉम स्नॅपड्रॅगनने लाँच केला ५जी ला सपोर्ट करणारा प्रोसेसर

qualcom
मुंबई : नुकतेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन या स्मार्टफोन प्रोसेसरचे ८२१ हे नवे व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. हे सध्या अनेक हायएन्ड स्मार्टफोनमध्ये असलेल्या स्नॅपड्रॅगन ८२० या प्रोसेसरचे अद्ययावत व्हर्जन असेल. आधीच्या ८२०च्या तुलनेत लाँच करण्यात आलेले स्नॅपड्रॅगन ८२१ हे व्हर्जन तब्बल १० पट अधिक वेगवान असल्याचा दावा क्वालकॉमने केला आहे.

या नव्या व्हर्जनमुळे स्मार्टफोनचा फक्त स्पीडच वाढणार नाही तर बॅटरीचीही बचत होणार आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अॅप्सची कार्यक्षमताही वाढू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीच्या वतीने कोणकोणत्या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८२१ हा प्रोसेसर असेल हे अजून जाहीर करण्यात आलेले नाही, तरीही वर्षाखेरीपर्यंत हा अद्ययावत प्रोसेसर असलेले स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. क्वालकॉम या अमेरिकी कंपनीने चीनमधील शांघायमध्ये भरलेल्या वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये आगामी काळ हा ५जी स्पीड कम्युनिकेशनचा असल्याचे भाकित केले होते. त्यासाठीची रूपरेखाही त्यांनी या काँग्रेसमध्ये लाँच केली होती. वर्ल्ड मोबाईल काँग्रेस हा जगभरातल्या स्मार्टफोन कंपन्या आणि तंत्रज्ञांसाठी जमू कुंभमेळाच असतो.

Leave a Comment