अॅमेझॉन इंडियावर लिस्ट झाले सॅमसंगचे On7 प्रो आणि On5 प्रोचे नवे व्हेरिएंट

samsung
मुंबई – सॅमसंगने गॅलक्सी On7 प्रो आणि On5 प्रो या स्मार्टफोनला अॅमेझॉन इंडियावर लिस्ट केले असून मागील वर्षी हे दोन्ही स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते. आता लिस्ट केलेले हो दोन्ही अपग्रेडेड व्हेरिएंट आहेत. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत ९,१९० रु. आणि ११,१९० रु. ऐवढी आहे.

पूर्वीपेक्षा अधिक चांगले रॅम आणि दुप्पट इंटरनल स्टोरेज या दोन्ही स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे. तर हे दोन्ही स्मार्टफोन ६.० मार्शमेलो ओएस सपोर्ट असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोड, बाइक मोड सारखे आणखी काही सॅमसंगचे खास फीचर असणार आहे.

On5 प्रो स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले असून त्याचे १२८०x७२० रिझोल्यूशन आहे. त्याचबरोबर १.३Ghz क्वॉडकोअर प्रोसेसर आणि २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये २६०० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत ९१९० रु. आहे.

त्याचबरोबर On7 प्रो स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात २ जीबी रॅम असून १६ जीबी इंटरनल मेमेरी देण्यात आली आहे. On7 प्रोमध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून या स्मार्टफोनची किंमत ११,१९०रु. आहे.

Leave a Comment