१४९९ रुपयात मिळणार लेनोव्होचा वाईब के५ प्लस

lenovo
मुंबई : मोबाईल उत्पादक कंपनी लेनोव्हाने वाईब के ५ प्लस या स्मार्टफोनवर तुमच्यासाठी एक उत्तम ऑप्शन ठेवला असून फ्लिपकार्टवर ८४९९ रुपयांचा असणारा हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरवर तुम्हाला फक्त १४९९ रुपयात मिळणार आहे. त्याचबरोबर बिना एक्सचेंज ऑफरवर हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवर ७,९९९ रुपयांना घेता येणार आहे. एक्सचेंज ऑफरचा फायदा तुम्हाला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तुमचा जुना फोन कंपनीच्या नियमांमध्ये बसत असेल.

लेनोव्हो वाईब के५ प्लसमध्ये ५ इंचाचा आयपीएस एलसीडी फुल एचडी आणि १०२० x १९२० पिक्सल रिझोल्यूशनचा डिस्प्ले देण्यात आला असून यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१६ क्वाडकोरचा प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबीची इनबिल्ट स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅटरी क्षमता २७५० mAh ऐवढी असून यात ४जी LTE, वायफाय ८०२.११ b/g/n, ब्लूटूथ ४.१, आणि मायक्रो यूएसबी २.० अशा कनेक्टीव्हिटी देखील देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment