सप्तपदी दरम्यान नवरदेवाची झाली पंचाईत

wedding
नवी दिल्ली – प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे लग्न. लग्नाच्या दिवसाच्या आठवणी पती-पत्नीसाठी खास असतात. या आठवणी लग्नानंतर अनेकवर्षांनीही दोघांच्या मनात घर करून असतात.

पण एका पंजाबी लग्न सोहळयात घडलेली घटना पती-पत्नीला लक्षात ठेवायला अजिबात आवडणार नसले तरी या लग्नाला उपस्थित वऱ्हाडी मात्र कायम लक्षात ठेवतील. गुरुव्दारामध्ये संपन्न झालेल्या विवाहात रितीनुसार वधू-वर सात फेरे घेत असताना अचानक नव-या मुलाच्या पायजम्याची नाडी सुटल्यामुळे नवरदेव फेरे घेताना एकाहाताने सुटणारा पायजमा सावरत होता. तेवढयात नवरदेवाची आई पुढे आली आणि तिने सुटणा-या पायजम्याची नाडी बांधली. सोशल मिडीयावर या प्रसंगाचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.