येतेय महिंद्राची नवी एमपीव्ही

mahindra
आपल्या दमदार एसयूव्ही गाड्यांनी देश विदेशात लोकप्रिय ठरलेल्या महिंद्रा अॅन्ड महिंद्राची नवी एमपीव्ही लवकरच बाजारात येण्याची शक्यता असून अद्यापी नांव न ठरलेल्या या गाडीचे टेस्टींग सुरू असताना स्पाय कॅमेर्‍यांनी काढलेले फोटो व्हायरल झाले आहेत. टोयोटाच्या नव्या इनोव्हा क्रिस्टाला टक्कर देण्यासाठी महिंद्र नव्या एमपीव्हीवर काम करत असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून समजते.

ही नवी एमपीव्ही कदाचित झायलोचे नेक्स्ट जनरेशन असेल अथवा पूर्णपणे नवीन गाडीच असेल असे फोटोंवरून दिसत आहे. महिद्राचे कार्यकारी संचालक पवन गोएंका यांनी गेल्या महिन्यात कंपनी दोन नवीन प्लॅटफॉर्मवर काम करत असल्याचे जाहीर केले होते. त्यातील एक कार येत्या वर्षभरात बाजारात येणार आहे. टेस्टींग करताना फोटोत दिसलेली महिंद्राची नवी एमपीव्ही सात वा आठ सीटर आहे. ती झायलोपेक्षा लांबीला थोडी अधिक आहे. दोन सेंट्रल एअरडॅम, टिवन बीम हेडलँप, क्रोम स्टील ग्रिल असलेल्या या गाडीचे इंजिन २.२ लिटर एम हॉक व दिल्ली एनसीआरसाठी १.९९ लिटर डिझेल असेल असेही समजते.