अलिबाबाची इंटरनेट कनेक्ट कार आरएक्स फाईव्ह

alibaba
ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अलिबाबाने इंटरनेटशी कनेक्ट राहणारी कार ओएस कार आरएक्स फाईव्ह या नावाने बाजारात आणली आहे. एसएआयसी मोटर्स कार्पोरेशनच्या सहाय्याने ही कार बनविली गेली आहे. यून ओएस (वाययूएन) ही अलिबाबाची स्मार्ट ऑपरेटिंग सिस्टीम असून ती खास ऑटोमोबिल इंडस्ट्रीसाठीच बनविली गेली आहे.

अलिबाबाचे अध्यक्ष जॅक मा या संदर्भात बोलताना म्हणाले, गेल्या कांही दशकांत मानवाने मशीन्सना स्मार्ट व वेगवान बनविण्यात यश मिळविले आहे. येत्या कांही काळात मानवी जीवनातील मशीन्सचे योगदान आणखी वाढणार आहे. सॉफ्टवेअर्सच्या सहाय्याने फोन स्मार्ट झाले आहे तसेच यून ओएस कार स्मार्ट बनवित आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

या कारमध्ये अॅडव्हान्स्ड फ्यूएल टेक्नॉलॉजी, पॉवरफुल अॅक्सिलरेटर, इंधन बचत, शॉर्ट ब्रेकींग डिस्टन्स या सारख्या आवश्यक बाबींवर अधिक लक्ष दिले गेले आहे. शिवाय इंटेलिजन्ट मॅप, लोकेशन ट्रेकींग फिचर्सही आहेत. ही कार स्मार्ट व्हॉईस कंट्रोलने नियंत्रित करता येईल. तसेच कारमध्ये इंटरनेट आयडी आहे व ती चालकाच्या स्मार्टफोन अथवा स्मार्टवॉचशी जोडलेली आहे. कारमध्ये चार कॅमरे दिले गेले आहेत ते सेल्फी अथवा व्हिडीओ बनविण्यासाठी वापरता येणार आहेत. या कारच्या किमती रूपयांत १० लाख ते १९ लाख दरम्यान आहेत.

Leave a Comment