जगातला सर्वाधिक पगारदार सीईओ पॅट्रीक सून शियांग

patric
पॅट्रीक सून शियांग हे नेंटक्वेस्ट या कंपनीचे सीईओ आहेत व ते जगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ आहेत याची बर्‍याचजणांना माहिती नाही. शियांग यांचा पगार आहे वर्षाला साधारण १५ कोटी डॉलर्स. भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती व रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा वार्षिक पगार आहे १५ कोटी रूपये. म्हणजे शियांग यांचा पगार अंबानी यांच्या पगारापेक्षा ६६ पट अधिक आहे.

शियांग हे व्यवसायाने डॉक्टर आहेत व ते जगातले सर्वात श्रीमंत डॉक्टरही आहेत. ३० वर्षांपूर्वी ते द. अफ्रिकेतून अमेरिकेत आले. डॉक्टरकी करता करताच त्यांनी आंत्रेप्रेन्यूअर क्षेत्रात पाऊल टाकून नेंटक्वेस्ट ही बायोटेक कंपनी सुरू केली. कॅलिफोर्नियात मुख्यालय असणार्‍या या कंपनीचा गतवर्षी आयपीओ सादर केला गेला आहे. ही कंपनी फार मोठी नाही. शियांग यांचा बेसिक पगार १ डॉलर इतकाच आहे. पण त्यांना गतवर्षात १३.२२ कोटी डॉलर्स स्टॉक ऑप्शन्स स्वरूपात व दीड कोटी डॉलर्स स्टॉक अॅवॉर्ड म्हणून दिले गेले आहेत. कॅन्सर व दुसर्‍या प्रकारच्या संसर्गातून होणार्‍या आजारांवर ही कंपनी संशोधन करते.

शियांग यांचा फोर्ब्ज २०१६ च्या श्रीमंत यादीत ८१ वा क्रमांक आहे. या यादीत आत्तापर्यंत कुणीच डॉक्टर सामील नव्हता. शियांग यांची मालमत्ता आहे ११७० कोटी डॉलर्स.

Leave a Comment