अरे देवा… चोरीला गेल्या रानी, करिना व माधुरी

theft
श्योपूर – एक विचित्र घटना मध्‍यप्रदेशच्या श्‍योपूरमध्ये घडली असून येथील एका घरातून रानी, करिना व माधुरी बेपत्ता झाल्या आहेत. तुम्ही ही नावे ऐकून थोडे तरी विचारात तर पडलेच असणार आणि तुम्हाला या आघाडीच्या अभिनेत्रींची चोरी होऊच कशी शकते? असा प्रश्न पडला असेल.

तर टेन्शन घेण्याचे कारण नाही, कारण रानी, करिना आणि माधुरी या काही चित्रपट अभिनेत्री नसून या तिन्ही बकऱ्या आहेत. बालापुराबस्तीमध्ये राहणाऱ्या जरीनाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या तिन्ही बकऱ्या चोरल्या आहेत. जरीनाने सांगितले की, बकऱ्या चोरीला गेल्याची पोलिसात तक्रार केली आहे. परंतु पोलिसांनी या प्रकरणी कोणतीच कारवाई केलेली नाही. जरीनाने सांगितले की, माधुरीने ७ दिवसांपूर्वीच एका पिल्ल्याला जन्म दिला होता. त्यालाही अज्ञात चोरांनी उचलून नेले आहे. दुसरीकडे फरजाना यांचा टायगर व जुगनू हे बकरेही चोरीला गेले आहेत. जरीना व फरजाना बरोबरच वस्तीमधील १२ हून अधिक लोकांच्या ८० हून अधिक बकऱ्या चोरीला गेल्या आहेत.
goat
अकबरचा एक बोकड व एक बकरी १६ हजार किंमतीचा, खातून यांच्या ८ बकऱ्या त्यांची ३० हजार किंमत होती. खैरूनिशा यांनी सांगितले की, १४ बकऱ्या व ४ बकऱ्या चोरीला गेल्या आहेत. असगर यांचा एक बकरा व ५ बकऱ्या, रसीदाच्या तीन सफेद रंगाच्या बकऱ्या. रजियाचा एक बकरा व तीन बकऱ्या. समरीन यांच्या १५ बकऱ्या चोरीला गेल्या आहेत. स्थानिक लोकांनी सांगितले की, सर्व बकऱ्या दिवसाढवळ्या चोरीला जात आहेत. त्यांना कोण उचलून नेत आहे हे अजूनपर्यंत समजले नाही. हे काम स्थानिक चोरांचे असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment