अरविंद पनगरियांच्या खांद्यावर आरबीआयची धूरा ?

arvind-pangariya
मुंबई : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे रघुराम राजन यांचा कार्यकाल संपल्यानंतर नवे अध्यक्ष कोण याबाबतची सर्वांनाच उत्सूकता आहे. मात्र, या चर्चेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांचे नाव आघाडीवर आहे. पनगरिया हे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या गुजरात मॉडेलचे जोरदार समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे गव्हर्नर पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा आहे.

मोदी सरकार ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्तेत आले. सत्तेत आल्यावर अवघ्या काही दिवसातच भारताचा ‘नियोजन आयोग’ मोडीत काढीत मोदी सरकारने ‘नीती आयोग’ स्थापन केला. याच ‘नीती आयोगा’चे संस्थापक उपाध्यक्ष म्हणजे अरविंद पनगरिया होय. पनगरीयांच्या नावाची तेव्हा खूपच चर्चा झाली होती. मात्र, त्यांच्या ‘नीती आयोगा’चे काम कसे चालले आहे. त्यांनी उपाध्यक्ष म्हणून नेमके काय केले या बाबत फारच कमी माहिती उपलब्ध आहे. किंबऊना ती माहिती फारशी उजेडात आली नाही.

सध्याच्या ‘नीती आयोगा’चे उपाध्यक्ष असलेले पनगरिया यांनी कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे. तसेच, एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक, आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशन आणि संयुक्त राष्ट्रांच्या कामाचाही पानगरिया यांना अनुभव आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ ४ सप्टेंबरला संपणार आहे.

Leave a Comment