भारताची पहिली क्राऊडफंडेड इलेक्ट्रीक सायकल स्पेरो

spero
भारताची पहिली क्राउडफंडींग मधून तयार झालेली इलेक्ट्रीक सायकल स्पेरोच्या प्री ऑर्डर बुकींगला सुरवात झाली असून ती ३ मॉडेल्समध्ये उपलब्ध करून दिली आहे. फ्यूएलड्रीम डॉट कॉमवर तिच्या किमती २९९०० ते ५०९०० रूपयांदरम्यान आहेत. अर्थात आत्ताच ती बुक केली तर मार्केट प्राईजपेक्षा ती ४० टक्के कमी किंमतीत मिळू शकणार आहे.

पर्यावरणपूरक अशी ही सायकल कोईमतूर येथील मणीकंदन यांनी तयार केली आहे. एमबीए पदवीधर असलेले मणीकंदन गेली ३ वर्षे ती तयार करत होते. यात बेसिक मॉडेल सिंगल चार्जवर ३० किमी चालते तर अन्य दोन मॉडेल्स सिंगल चार्जवर ६० ते १०० किमीचे अंतर जाऊ शकतात. यासाठी सॅमसंगची बॅटरी वापरली गेली असून ही बॅटरी चार तासात २० ते ८० ट्कके चार्ज होते. पॅडलींग करतानाही बॅटरी चार्ज होऊ शकते. तिला पाच गिअर आहेत व इलेक्ट्रीक मोडमध्ये क्रूझ कंट्रोल फिचर दिले गेले आहे. युजर या मोडमध्ये सायकलचा मॅक्झिमम स्पीड लॉक करू शकतो.

यासाठी वापरली गेलेली फ्रेम स्टँडर्ड सायकलप्रमाणेच आहे. ग्राहक जरूरीप्रमाणे या सायकलला बाईक लॉक्स, बाईक रॅक्ससारखी जादा फिचर्स जोडू शकतो. क्राऊड फंडिगमधून या प्रोजेक्टसाठी सध्या साडेनऊ लाख रूपये जमविले गेले आहेत. विशेष म्हणजे फ्यूएलड्रीम डॉट कॉमवरचे हे सध्याचे हायेस्ट फंडेड कँपेन आहे.

Leave a Comment