जगातले १ कोटी अँड्राईड फोन विषाणूचे शिकार

virus
सॉफ्टवेअर सुरक्षा संस्थेच्या म्हणण्यानुसार यावेळी जगातले १ कोटींहून अ्रधिक अँड्राईड स्मार्टफोन धोकादायक विषाणूची म्हणजे व्हायरसची शिकार बनले आहेत. हा विषाणू म्हणजे एकप्रकारचे सॉफ्टवेअरच आहे. हे सॉफ्टवेअर जाहिरातींसाठी नकली क्लिक जनरेट करते व त्यामुळे न कळत स्मार्टफोनवर नकली अॅप इन्स्टॉल केली जातात व ती युजरच्या ब्राऊझिंगवरही नजर ठेवतात. हा व्हायरस तयार करणार्‍यांनी गेल्या १ महिन्यात या प्रकारे ३ लाख डॉलर्सची कमाई केली असून हा प्रकार दिवसेनदिवस वाढत चालला आहे.

या विषाणूचा सर्वाधिक परिणाम चीन, भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स येथील स्मार्टफोनवर झाला आहे. लूक आऊट, चेक पॉईंट सुरक्षा कंपन्यांनी ही माहिती दिली आहे. या व्हायरसला त्यांनी हमिगबाद नाव दिले असून ते एक मालवेअर सर्कीट आहे. ते ऑपरेटिंग सिस्टीममध्ये घुसते व त्याला शेाधून काढणे हे अवघड काम आहे. याचा कंट्रोलर यामुळे हँडसेटवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतो. अँड्राईडची जुनी व्हर्जन या विषाणूला अधिक प्रमाणात बळी पडली आहेत. गुगलने या विषाणूंची त्यांना कल्पना असल्याचे जाहीर केले असून हे विषाणू ओळखता यावेत यासाठी सिस्टीम अधिक चांगल्या करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment