आशियातील सर्वात मोठे नवग्रह मंदिर मध्यप्रदेशात

navgrah
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जवळच्या डबरा या गांवी आशियातील सर्वात मोठ्या नवग्रह मंदिराचे बांधकाम सुरू असून हे मंदिर २०१७ डिसेंबर मध्ये सर्वांसाठी खुले होणार आहे. या मंदिराचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. परशुराम लोक न्यास समिती कडून या संदर्भातली माहिती देण्यात आली. १०८ खांबांवर हे मंदिर बांधले जात आहे. हिंदू संस्कृतीत १०८ या अंकाला विशेष महत्त्व असून हा शुभ अंक मानला जातो.

हे मंदिर तीन मजली आहे व त्याची उंची आहे ९० फूट. मुख्य भाग ४० हजार चौरस फुटांचा आहे. मंदिराच्या कामासाठी राजस्थानच्या मकराना कारागीरांना पाचारण केले गेले आहे. असे ७० कारागिर येथे आहेत. या मंदिराच्या सर्वात वरच्या मजल्यावर सूर्य मंदिर असेल. सूर्य हा नवग्रहांचा राजा समजला जातो म्हणून त्याचे मंदिर सर्वात वर आहे. त्या खाली चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू व केतू यांच्या प्रतिमा आहेत. त्यानंतरच्या पातळीवर या ग्रहांच्या देवता स्थापन केल्या जाणार आहेत. सर्वात तळातल्या मजल्यावर ध्यान मंदिर व सत्संगासाठी भला मोठा हॉल असेल.

सध्याचे सर्वात मोठे नवग्रह मंदिर आसाममधील गुवाहाटीजवळ आहे. व ते आशियातील सर्वात मोठे नवग्रह मंदिर आहे.

Leave a Comment