स्टेशनवरील कचरा विक्रीतून रेल्वे वाढविणार महसूल

kachara
रेल्वे मंत्रालयाने रेल्वे भाड्याशिवाय महसूल गोळा करण्यासाठी जे अन्य पर्याय विचारात घेतले आहेत त्यात स्टेशनवरील कचरा विक्रीतून महसूल मिळविण्याची योजनाही राबविली जाणार आहे. देशभरातील रेल्वे स्टेशनवर जमा होणारा कचरा गोळा करून त्यापासून उर्जा व खत बनविले जाणार असून त्याच्या विक्रीतून हा महसूल गोळा करण्याच्या प्रस्तावावर सध्या काम सुरू असल्याचे समजते.

यासाठी रेल्वेने कचरा प्रबंधन समूहाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. ही एक वेगळी संस्थाच त्यासाठी कार्यरत केली जाणार आहे. ती देशभरातील सर्व स्टेशन्सवरून कचरा गोळा करून, ओला व सुका कचरा वेगळा करून त्यापासून उर्जा निर्मिती व खत प्रकल्प राबविणार आहे. दीड रूपये प्रति किलोने हा कचरा खरेदी केला जाणार आहे. त्यासाठी नेमण्यात येणारे कर्मचारी तसेच कचर्‍यासाठीच्या पिशव्या यांची सोय या समितीनेच करावयाची आहे. कर्मचार्‍यांचा विमा ही संस्था उतरविणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर देशातील अमृतसर, अंबाला, हरिद्वार, जम्मू कटरा, डेहराडून, मुरादाबाद, सहारनपूर, सीटीसी, मुंबई सेंट्रल व दादर अशा १२ स्टेशनवर हा प्रयोग केला जात असल्याचेही समजते.

Leave a Comment