मायक्रोएसडीपेक्षा अतिजलद सॅमसंगचे युएफएस मेमरी कार्ड

samsung
नवी दिल्ली – अतिजलद असे यूएफएस (यूनिवर्सल फ्लॅश स्टोअरेज) मेमरी कार्ड मोबाईल फोन क्षेत्रातील अग्रमानांकित कंपनी सॅमसंगने सादर केले असून, अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच कार्ड असल्याचा दावा कंपनीने केला असून साधारण मायक्रोएसडी कार्डाच्या मागणीवर यूएफएसच्या आगमनाने परिणाम होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मानणे आहे. या यूएफएस कार्डमध्ये सामान्य मायक्रोएसडी कार्डापेक्षा पाच पट अधिक जलद गतीने फाईल ट्रान्सफर करण्याची क्षमता आहे. हे कार्ड सध्या ३२ जीबी, ६४ जाबी, १२८ जाबी आणि २५६ जाबी स्टोअरेजमध्ये उपलब्ध असून, ही मेमरी कार्ड्स DSLR, 3D VR कॅमेरा, अॅक्शन कॅमेरा आणि ड्रोन्स इत्यादी हाय रेझोल्युशन शुटिंग डिव्हाइसाठी निर्माण करण्यात आली आहेत. हे कार्ड ५३० एमबी प्रतिसेकंद डेटा रिड करत असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. जे सामान्य कार्डाच्या तुलनेत पाच पट जलद आहे. हे कार्ड ५ जीबीचा फूल एचडी चित्रपट केवळ १० सेकंदात रिड करू शकते. यासाठी सामान्य कार्डास ५० सेकंदाचा वेळ लागतो. सामान्य मायक्रोएसडी कार्डाची रिडिंग क्षमता ९५ एमबी प्रतिसेकंद असते. यूएफएस कार्डाच्या मागील बाजून एक विशिष्ट प्रकारचे पिन कनेक्शन असते, जे यास सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मायक्रोएसडी कार्डापेक्षा वेगळे ठरवते. हे कार्ड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरसाठी अधिक उपयुक्त ठरेल असे कंपनीचे मानणे आहे.

Leave a Comment