टाटाची काईट फाईव्ह वर्षअखेरी बाजारात येणार

kite5
दिल्लीच्या ऑटो शो २०१६ मध्ये शोकेस केलेली टाटा मोटर्सची काईट फाईव्ह ही सबकॉम्पॅक्ट कार या वर्षअखेरीस बाजारात दाखल होणार असल्याचे कळते. या कारचे स्पाय कॅमेर्‍याने टिपलेले कांही फोटो नुकतेच लिक झाले आहेत. ही कार टाटांच्या इंडिका इसीएसला रिप्लेस करेल. डिझेल व पेट्रोल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये ती मिळणार आहे.

टाटा मोटर्सने या नव्या सबकॉम्पॅक्ट कारच्या डिझाईन व स्टाईलवर विशेष लक्ष दिले आहे. या कारचे कोडनेम काईट फाईव्ह आहे. कारचा फ्रंट लूक टियागो प्रमाणेच आहे शिवाय तिला हायमाऊंटेड एलईडी स्टॉप लँप दिला गेला आहे. इंटिरीयरही टियागोशी साध्यर्म दाखविणारे आहे. रिअर आर्म रेस्ट, कप होल्डर, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रिव्हर्स कॅमेरे, थ्री स्पोक स्टिअरिंग व्हील, ब्ल्यू टूथ, यूएसबी, ऑक्स कनेक्टिव्हीटी, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज अशी तिची अन्य फिचर्स आहेत.

या कारला १.२ लिटर, ३ सिलींडर पेट्रोल व १.० लिटर ३ सिलींडर डिझेल इंजिन, पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले गेले असून नंतर ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनही दिले जाणार आहे.

Leave a Comment