यंदाचे वर्ष एक सेकंदाने मोठे असणार

ghadyal
यावर्षी ३१ डिसेंबर ला २३ वाजून ५९ मिनिटे व ५९ सेकंद होताच जगातील घड्याळांच्या स्टँडर्ड वेळेत १ जादा सेकंद जोडले जाणार आहे. अमेरिकेच्या नौसेना पर्यवेक्षण शाळेने या संदर्भातली घोषणा केली आहे. भारतीय वेळेनुसार १ जानेवारी २०१७ रोजी पहाटे ४ वाजून २९ मिनिटे व ५९ सेकंद होताच हा बदल केला जाईल. वेळ गणना पद्धतीनुसार पृथ्वीच्या फिरण्याच्या वेळेनुसार वेळ निश्चित केली जाते. मात्र आता परमाणू घड्याळाचा शोध लागल्यापासून वेळेसाठीची अधिक अचूक मानके देणे शक्य झाले आहे.

या आधाराने मोजली गेलेली सेकंदाची वेळ पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगापेक्षा थोडी वेगळी असते. १९७० ला झालेल्या आंतरराष्ट्रीय वेळ मापन प्रक्रिया करारानुसार कांही निर्णय घेतले गेले आहेत.त्यामुळे युटीसी व युटी १ या कालगणनेतील वेळ कायम राखली जाते. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अॅन्ड रेफरन्स सिस्टीम ही संस्था या दोन वेळ मानकातील अंतरामध्ये गरजेनुसार यूटीसी मध्ये १ सेकंद अधिक जोडणे अथवा १ सेकंद कमी करणे या संदर्भातले आदेश देते.

Leave a Comment